" प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ॥ तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥ "


तुम्ही येथे आहात: >> समाज दर्शन >> साळी संत >> ह. भ. प. श्री. सोपानराव एकनाथ सवाईराम
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

ह. भ. प. श्री. सोपानराव एकनाथ सवाईरामः

सोलापूर येथील थोर समाजसेवक व स्वकुळसाळी समाज, नवी पेठ सोलापुराचे संस्थापक तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार ह. भ. प. सोपानराव एकनाथ सवाईराम यांचे मिती पौष कृष्ण ५ शके १९२५ सोमवार दि. १२/१/२००४ रोजी दु:खद निधन झाले. मृत्युसमयी ते ८४ वर्षांचे होते.

त्यांचा जन्म माढा जि. सोलापूर येथे दि. १२/४/१९२० रोजी झाला. ते १९३४ मध्ये व्हर्नाक्युलर फायनल झाले. सन १९३८ मध्ये त्यांचा कृष्णाबाई ठोंबरे रा. माढा यांच्याशी विवाह झाला. त्यांना पाच मुले व एक मुलगी असून सर्व विवाहित आहेत. अनुक्रमे त्यांची नावे प्रभाकर, मधुकर, सुधाकर, भास्कर, दिनकर व सुरेखा अशी असून सौ. विजया, सौ. रंजना, सौ. संध्यारजनी, सौ. रत्नमाला, सौ. उज्वला या त्यांच्या पाच स्नुषा व रतन लटिंगे, पुणे हे जावई आहेत. याशिवाय सहा नातू, आठ नाती, दोन नातसुना, दोन नातजावई व पाच पणतू असा समृद्ध परिवार आहे.

ते लहानपणापासून संपूर्ण शाकाहारी होते. त्यांचा विठठलभक्तीकडे ओढा असल्याने त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच पंढरपूर येथील ह. भ. प. धोंडोपंत दादा महाराज यांना गुरू करून तुळशीची माळ घातली. ते नियमित एकादशीव्रत करीत व पंढरपुराला पायी माघवारीस जात असत. वारकरी संप्रदायात ते ह. भ. प. सोपानबुवा म्हणून ओळखले जात. ते चांगले कीर्तनकार होते व भजन पूजन व संतवाड्मयाचा अभ्यास करीत असत. ते सहा महिने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सेवेकरी होते. व त्यांना एक सप्ताह गरुड खांबाजवळ कीर्तनाच्या भजनाचा मानही मिळाला. त्यांचेकडे ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत अशी भरपूर ग्रंथसंपदा  आहे.

समाजसेवेचे त्यांना भरपूर आवड होती. ते खूप वर्ष नवी पेठ स्वकुळ साळी मंडळाचे अध्यक्ष होते. समाजाचा जिव्हेश्वर उत्सवही बरीच  वर्षेत स्वतःच्या घरीच करीत असत. त्यांच्याकडे समाजातील बऱ्याचं लोकांची माहिती संकलित होती. तसेच १९६० ते ८० दशकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जवळ जवळ १२५ लग्न जमवून दिली. व नि:स्वार्थ बुद्धीने समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता ते ज्योतिषशास्त्र निपुण होते. त्यांनी बऱ्याचं लोकांच्या पत्रिका पाहणे व काढणे अशी कामे केली. ते ज्योतिषशास्त्रविषयक सल्ला देत

वडिलांचे छत्र लवकरच हरपल्याने व एकत्र कुटुंबात सर्वांत मोठे असल्याने कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. ते गिरणी कामगार होते. परंतु जेमतेम परिस्थितीमुळे त्यांनी प्रपंच चालवण्यासाठी हातमाग व यंत्रमाग चालवले. घरोघरी जाऊन साड्या विकल्या, सोनाराकडे काम केले., छापखान्यात काम केले. आणि सर्व भावा - बहिणींची तसेच मुला-मुलींची, पुतण्याची, नातवांची लग्ने लावून सर्वांना व्यवस्थित मार्गी लावले. कुटुंबात सर्व जण त्यांना "अण्णा" म्हणत. ते शिक्षणप्रेमी असल्याने 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' याची शिकवण देत व आचरणात आणत. त्यांचे अक्षर अत्यंत सुंदर मोत्यासारखे होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांनी सर्व पाच मुलांना उच्चशिक्षण व चांगले संस्कार दिले. त्यामुळे ते सर्व जण आज उत्तम स्थितीत आहेत.

त्यांची अत्यंत साधी राहणी व आधुनिक विचारसरणी होती. ते निःस्वार्थी व निर्ग्वी होते. बोलण्यात मवाळ पण स्पष्टवक्तेपणा होता. यांचा आवाज खणखणीत व स्पष्ट होता. ते गोष्टीवेल्हाळ व शाब्दिक कोटी बहादूर होते. त्यांची स्मरणशक्ती कमालीची तीव्र असून ती शेवटपर्यंत शाबूत होती. ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे संपूर्ण जीवन निरोगी होते. वयाच्या ७५ व्या वर्षांपर्यंत ते औषधाविना राहिले. मात्र ऑगस्ट १९९९९ मध्ये डाव्या पायाच्या खुब्याचे ऑपरेशन झाल्यापासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांनंतर २००३ च्या दिवाळीत त्यांना अंथरुणाला खिळून राहावे लागले व शेवटी १२ जानेवारी २००४ रोजी संध्याकाळी ७. ४५ वा. त्यांचा आत्मा परमात्यास जाऊन मिळाला. जीवशिवाचे मिलन झाले व एका ऋषितुल्क, बहुआयामी व समृद्ध व्यक्तित्वाचा अंत  झाला.
(संदर्भ : श्री सुधाकर सो. सवाईराम माळवाडी रोड, हडपसर, पुणे)

टीप - वरील संतांविषयी अधिक माहिती/फोटो मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवा.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे

प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.