" चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव, पीयूषांचे ॥५॥ "


तुम्ही येथे आहात: >> समाज दर्शन >> साळी संत >> ह. भ. प. श्री. नंदकुमार दत्तोबा तांबे
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

ह. भ. प. श्री. नंदकुमार दत्तोबा तांबे:
जन्मल्यानंतर अवघ्या आठव्या दिवशी तमाशाच्या रंगमंचावर पाय ठेवण्याची अदभुत कामगिरी करणारे साळी समाजातील श्री. नंदकुमार दत्तोबा तांबे यांनी कित्येक वर्षी तमाशाचे फड गाजवले आणि त्यानंतर मागणी असून सुद्धा, तमाशाकडे पाठ फिरवून वारकरी संप्रदायाची वाट धरली हेही अदभुतच!

लोणावळा येथे वारकरी संप्रदायातर्फे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. त्यात कीर्तनकारबुवांना व भजन गायनाला संतसंगत म्हणून मृदंगमणी श्री. नंदकुमार तांबे आले होते. त्यावेळी त्यांच्याबद्दलची वरील प्रकारची माहिती काही कीर्तनकारबुवांच्या कानावर आली. तेव्हा आशच्रर्यानंदाचा सुखद धक्का बसला!

त्यांनी लोकांना सांगितले, "आजपासून तमाशा फडावरचा नंदकुमार मेला. मी देह माउलीच्या चरणी वाहिला आहे. " मग ते बोरू गावात गेले. तिथे श्रावण सप्ताह सुरू होता. माउलीची सेवा हातून घडावी म्हणून भजन-कीर्तनात महाराजांना साथ करू लागले. टाळ, मृदंग, तबला यावर प्रभुत्व प्राप्त करायला वेळ लागला नाही. कीर्तनातली जाणकार मंडळी त्यांना म्हणतात. माउलीने तुझ्यावर केवढी कृपा केली! म्हणूनच तुम्ही ढोलकीवाले असूनही, मृदंगातून उत्तम बोल काढू शकता. तुमची हि कला पाहून आम्ही चकित होतो. निरनिराळ्या ठिकाणी वर्षभर असे सप्ताह होतच होते व नंदकुमार सगळीकडे जात राहिले. त्यामुळे कीर्तन-प्रवचन-भजनात संतवाड्मय आपोआप त्यांच्या कानावर पडत गेले. मनाची मरगळ जाऊन, शांती प्राप्त झाली.

नंतर वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन माळ घालावी म्हणून ते साकुरीच्या सुदाम महाराज बनकरांकडे गुरू म्हणून शरण गेले पण गुरुंचा त्यांच्यातील बदलावर चटकन विश्वास बसला नाही. वर्षभर परीक्षा पाहून मगच त्यांची माळ घातली. नंदकुमार धन्य झाला.


टीप - वरील संतांविषयी अधिक माहिती/फोटो मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवा.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे
प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.