" विद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम ॥ पुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥ "


तुम्ही येथे आहात: >> समाज दर्शन >> साळी संत >> ह. भ. प. ध्यानयोगी श्री. एकनाथ तुकाराम पावले
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

ह. भ. प. ध्यानयोगी श्री. एकनाथ तुकाराम पावले:
त्यागी पुरुष कै. एकनाथ तुकाराम पावले यांचा जन्म महाड येथे वारकरी घराण्यात दि. २०/११/१९२८ रोजी झाला. त्यांना सहा भाऊ व चार बहिणी आहेत. कठीण परिस्थितीत नाईट स्कूलचे शिक्षण घेऊन ११ वी उत्तीर्ण झाल्यानंतर कस्टम ऑफिसमध्ये शिपाई म्हणून नोकरीस लागले. एका वर्षानंतर कारकून म्हणून त्यांची पदोन्नती झाली. दहा वर्षाच्या सांसारिक जीवनांनंतर म्हणजे त्यांच्या दोन मुली व मुलगा श्री. श्रीराम हा पाच महिन्यांचा असताना, मोह माया सोडून श्री  एकनाथ तुकाराम पावले हे पाँडेचेरीत श्री. अरविंद आश्रम येथे राहू लागले. १९६५ पासून ४२ वर्षे आश्रमाचे काम करून, योग साधना करीत आश्रमाच्या सेवेत असताना दि. २/१०/२००७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र श्री. श्रीराम एकनाथ पावले हे आपल्या शैक्षणिक अभ्यासानंतर पाँडेचेरी येथे राहत आहेत.


टीप - वरील संतांविषयी अधिक माहिती/फोटो मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवा.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे


प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.