| संत या शब्दाचा धात्वर्थ सद्वस्तू असा आहे. तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. देहाहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व होय. साधू, संत, सज्जन आणि भगवद्भक्त हे साधारणपणे एकच असतात. भगवद्गीतेमधील दुसर्या अध्यायातील स्थितप्रज्ञ, सहाव्या अध्यायातील योगी, बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त, चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील कर्मसंन्यासी, हे सर्व एकच. ब्रह्मनिष्ठ किंवा ईश्वरभावाला प्राप्त झालेल्या विभूतींची नावे जरी भिन्न असली तरी वृत्ती सारखीच असते. भागवतात अशा महात्म्यांना "भागवत' किंवा भागवतोत्तम संत असे म्हणतात. साळी समाजातही अनेक संत होऊन गेले आणि त्यांच्या कार्यांने आपल्या समाजाला महत्त्व प्राप्त झाले. आपण सर्व समाजबांधव त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. आपल्या समाजातील साळी संतांची माहिती आम्ही या विभागामध्ये देत आहोत. आवाहन - आपल्या समाजातील साळी संतांची अधिक माहिती/फोटो तुम्हाला मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवून द्या. | |