" नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ॥ एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥ "


तुम्ही येथे आहात: >> समाज दर्शन >> संस्था / कार्यालये / मंडळ >> वेदमुर्ती जिव्हाजी कला प्रबोधिनी संस्था, कराड
कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

वेदमुर्ती जिव्हाजी कला प्रबोधिनी संस्था, कराड
सामाजिक | सांस्कृतिक | आरोग्य | क्रिडा


नोंदणी क्रमांक:
- महा/१४०५७/सातारा
कार्यालयाचा पत्ता - १२८ शुक्रवार पेठ, साळी गल्ली, कराड.
मोबाईल नं. - ९४२३८६८०२२

अध्यक्ष - जोतीराम नाना कांबळे
उपाध्यक्ष - मिलिंद च. गोंधळी
खजिनदार - मदरंद भा. मोटे
सेक्रेटरी - अच्युत म. भंडारे

नम्र आवाहन....
कृष्णा-कोयना प्रीतिसंगमावर वसलेल्या ऐतिहासिक कर्‍हाड नगरीला देशात मोठा नावलौकिक आहे. अशा या सांस्कृतिक वारसा जपणार्‍या नगरीत सामाजिक भावनेतून  विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, जेष्ठांच्या, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा आदि क्षेत्रातील कलागुणांच्या वाढीसाठी, कृतज्ञतेसाठी, पर्यावरणाच्या प्रबोधनासाठी भरीव आणि यशस्वी कार्य व्हावे यासाठी वेदमुर्ती जिव्हाजी कला प्रबोधिनी संस्था कार्यरत झाली आहे. चालु वर्षात संस्थेमार्फत समाजातील विविध कलागुणात होतकरु असणार्‍या शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, तबलावादन स्पर्धा, शिल्पकला स्पर्धा आयोजित केल्या. निसर्गचित्रांची प्रात्यक्षिदे, सर्प ज्ञानविषयक कार्यशाळा, नेत्र तपासणी शिबिर, पर्यावरण पुरक वृक्षारोपणाचे कार्यक्रम, जेष्ठ बांधवांचा सत्कार कार्यक्रम आदी उपक्रमातून वेदमुर्ती जिव्हाजी कला प्रबोधिनी संस्थेची वाटचाल सुरु झाली आहे. "शिक्षणाचे तीन पैलु असतात - योग, उपयोग व सहयोग" योग म्हणजे जोडणे, चांगली कौशल्ये, उच्च ज्ञान सुप्रेरणा याची एकत्रित जोडणी करणे. या साधनांचा कल्याणासाठी वापर म्हणजे सहयोग करणे. हे तीन पैलु म्हणजे शिक्षण होय.

समाजातील आपणासारख्या प्रतिष्ठीत, जाणकारांनी वेदमुर्ती जिव्हाजी कला प्रबोधिनी संस्थेच्या माध्यामातून उभारलेल्या विविध उपक्रमांना आपल्या सदिच्छेने भरीव व आर्थिक मदत केल्यास सशक्त आणि समृध्द भारताची भावी पिढी निश्चितच गौरवशाली परंपरा निर्माण करेल. आपणाकडून हि संस्था वाढावी, संस्थेचे कार्य व्यापक विस्तृत व्हावे अपेक्षांनी आपणांस नम्रपणे मदत करण्याचे आवाहन..!

अध्याक्ष,
वेदमुर्ती जिव्हाजी कला प्रबोधिनी संस्था, कर्‍हाड.


टीप - वरील माहिती श्री. जोतीराम नाना कांबळे यांनी जिव्हेश्वर.कॉमला पाठविल्याबद्दल त्यांचे आभार..!

प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.
 
सदस्य प्रवेश
Only Registered Users can see Matrimony 2012(Vadhu-Var) Section.
वधू-वर नोंदणी
नविन माहीती ई-मेल द्वारे मिळवा

पहा जिव्हेश्वर.कॉम आत फेसबुकवर आणि आजच सहभागी व्हा फेसबुकवरील स्वकुळ साळी ग्रुप मध्ये.