" अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ॥ तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥ "


कार्यक्रम दिनदर्शिका
May 2012
SMTWTFS
2930 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 3112

कोणी एक काळी वरुणराजा
काशी नगरी राज्य करी
नित्य नेम त्याचा
शिवाचा तो रात्रंदिवस जप करी
गंगेच्या काठी असावे
एक शिव मंदिर सुंदर
हीच मनोकामना घेऊन
वरुण राजा निघाला कैलास पर्वतावर
हात जोडून विनंती केली
भोळ्या सांब सदाशिवास
माता पार्वती सवे येऊन रहावे आपण काशिस
तात्काळ केली महादेवाने ती विनंती मान्य
म्हणे गंगातिरी राहण्याचे माझे मोठे भाग्य
कैलास पर्वत सोडून जाणार सांब सदाशिव
कळले हे नारदास
धावत जाऊन वार्ता दिली
त्याने जिव्हाजीस
कैलासावर येऊन जिव्हाजी बोले हे तात
तुम्हाविणं कैसा राहू मी या जगात
मी ही येईन म्हणतो तुम्हासवे काशी नगरीत
पार्वती जिव्हाजीसवे निघाले महादेव काशीस
काशी नगरी पाय पडता तो कुशल विणकर
एका मागून एक वस्त्रे विणली त्याने अनमोल
पहिले वस्त्र अर्पिले जिव्हाजीने पार्वती मातेस
बुट्टेदार शालू पाहताच माता बोलली
अहाहा...ऽऽ
ही तर साडी बनारस
तेव्हापासून झाले नामकरण
काशीचे बनारस
केले जिव्हाजीने तयार अनेक कुशल कारागीर
झाली ख्याती शालू बनारसची सर्व जगभर
"काम झाले आता निघतो"
जिव्हाजी म्हणाले महादेवास
म्हणे महादेव जिव्हाजीस
सार्‍या सृष्टीची तू वस्त्राने लज्जा राखलीस
सार्‍या देवादिकांमध्ये तूच एक श्रेष्ठ
काशी विश्वेश्वर म्हणून मानतील ही पुण्यनगरी
माझा काळ भैरव म्हणून रहा तू या माझ्या दारी
काशी क्षेत्री महती माझी काशी विश्वेश्वर म्हणूनी
माझ्या आधी घेतील दर्शन तुखे कालभैरव म्हणूनी
कालभैरव म्हणूनी राहतसे जिव्हाजी गोघाटी
दर्शन घेण्या मंदिरामध्ये झाली भाविकांची दाटी
स्वकुळ जन हो ऐका ही जिव्हाजीची कहाणी
जिव्हाजीचे हे रुप पहाण्यास
करा एकदा तरी वारी काशीची
करा एकदा तरी वारी काशीची

सौ. अंबुताई व्यं.मोडगी

प्रतिक्रिया येथे लिहा
तुमची संपर्क माहिती: (भाषा:-[मराठी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते मराठी] बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.)
प्रतिक्रिया:
छायाचित्रांकित सुरक्षितता
कृपया छायाचित्रातील वर्गीकरण येथे टाईप करा.
 
सदस्य प्रवेश
Only Registered Users can see Matrimony 2012(Vadhu-Var) Section.
वधू-वर नोंदणी
नविन माहीती ई-मेल द्वारे मिळवा

पहा जिव्हेश्वर.कॉम आत फेसबुकवर आणि आजच सहभागी व्हा फेसबुकवरील स्वकुळ साळी ग्रुप मध्ये.