जय देव जय देव जय जिव्हेश्वरा |
हो स्वामी स्वकुळा |
गौरीहर पुत्रा तू पार्वती कुमरा |
जय देव जयदेव ||धृ०||
स्वकुळ सोज्वळ नाही तव उपमा |
करिसी नित्य सेवा, नसे त्या सीमा |
तेहतीस कोटी देवांचा तव गृही वास |
चंद्रमौळीचा तू आहेस श्वास |
जय देव जयदेव ||१||
ब्रम्हज्ञानी तू देवांचा ज्ञाता |
देवा जिव्हेश्वरा तू तार आता |
सृष्टी वस्त्रे देवा भरजरी थोर |
जय देव जयदेव ||२||
पष्ठ स्वपुत्र लाडके फार |
परि दिधलेसी तू करण्या उध्दार |
धाडिले त्यांसी देशोदेशीला |
जिव्हेश्वरा कैसी केली तू लीला |
जय देव जयदेव ||३||
देवाधिदेवांचा असशी तू प्राण |
पार्वती मातेचा लाडका जाण |
रिठा सुराशी मारिले ठार |
कैलास क्षेत्राचा केला उध्दार |
जय देव जयदेव ||४||