उठा उठा सकळ जन | करा जिव्हाजीचे ध्यान ||
तोडा निद्रेचे बंधन | ना तरी घात आपुला ||१||
झोपे नोव्हेची कल्याण | ऐ सांगती संत जन ||
राखा त्यांचा मान | अनादर करु नका ||२||
ध्यानी तरले धृव बाळ | प्रल्हादची अजामेळ ||
ध्यान करीता सर्व काळ | नाश होई पापांचा ||३||
आपण तोची मार्ग धरु | जिव्हाजीचे ध्यान करु ||
तेणे होईल उध्दारू | सकळ भाविकांचा ||४||
शरण शरण जिव्हेश्वरा | तारी आपुलीया किंकरा ||
कृपा करी या सागरा | कृष्णाचरण वंदितो ||५||
श्री सदगुरुनाथ महाराज की जय | श्री जिव्हेश्वर भगवान की जय ||
सब संतनकी जय, बोला गोपालकी जय ||