पुणे स्वकुळ साळी समाजाचे नुकतेच मा. सर्जेराव जेधे, (ऑ.सेक्रेटरी-श्री शिवाजी मराठा सोसायटी, पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली उपवधू-वर मेळाव्याचे आयोजन केले होते. समाजभूषण विठ्ठलराव सातव जिम्नॅशियम हॉल येथे आयोजित केलेल्या या मेळाव्याचा प्रारंभ मा. सर्जेराव जेधे आणि अखिल भारतीय स्वकु़ळ साळी समाजाचे अध्यक्ष मा. सुभाष बेलेकर यांच्या हस्ते दीप्रज्वलन व भगवान श्री. जिव्हेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी अनिल खडामकर यांनी ओंकार स्वरूपं गाऊन वातावरण भक्तिमय केले.
या वर्षी मेळाव्यासाठी ६०७ इच्छुक उप वधू-वरांनी स्मरणिकेमध्ये नावे नोंदवलेली आहेत. स्मरणिकेमधील तीच पाने आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. यासाठी उपवधूंची यादी आणि उपवरांची यादी असे दोन उप-विभाग केलेले आहेत. डाव्याबाजुला ते विभाग आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही त्यातील माहिती पाहू शकता. तरी ज्ञातीबांधवांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.
ता.क. - १७-फेब्रु-२०१० रोजी पुणे स्वकुळ साळी समाज पुणे आयोजित उपवधू-वर मेळावा - सन २०१० ची पुरवणी प्रकाशित करण्यात आली. त्यात उपवधू-वरांची १३० नावे नोंदवलेली आहेत. त्याची विस्तुत माहिती डावीकडील उप-विभागात दिलेली आहे. तरी ज्ञातीबांधवांनी त्याच लाभ घ्यावा.