हिला लागले डोहाळे............
हाती तलवार घेऊन फिरावे
हे 'श्रीं' चे राज्य व्हावे
मनी आस स्वराज्य पाहती डोळे ||धृ||
मनी वैराग्याची खूण
विवेकानंदाची भक्ती जाण
मनी दाटे, आनंदाचे जाळे ||१||
हिला लागले डोहाळे.............
हिला आठवी राम लल्ला
हुंदड्या घालून करतो कल्ला
राम यावा पदरी, मनी दाटती उमाळे ||२||
हिला लागले डोहाळे.............
स्वप्नी दिसे कृष्ण सखा
खेळ आठवी सारखा
व्दारकेचा राणा, खेळे चोपाळे ||३||
हिला लागले डोहाळे.............
द्यागं सख्यानो आशीर्वाद
हिचे पुरवा डोहाळे
मनी वसे ते होऊ दे सगळे ||४||
-- दत्तकुमार --
१६-१-२००८ (बार्शी)