नवरात्रात देवीचे घरगुती पुजन (घट बसवणे)
प्रथम गणपती पूजन
प्रथम गणपती मुर्ती किवासुपारी पाण्याने धुऊन व गंध लाऊन तांदळावर ठेऊन पुढील मंत्राने गणपती पूजन करावे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विन्घ कुरमेंदेओ सर्व कार्येषु सर्वदा || आवाहनार्थे अक्षता समर्पयामि
अक्षता, हळदी कुंकू अत्तर, दुर्वाफुले वाहूनधुप दीप दाखवावा. नंतर पुढील मंत्राने गुळखोबरे नेवेद्य दाखवावा.
प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा ब्रम्हनेन नमा ||
देवीचे पुजन (घट बसवणे)
त्यानंतर पाट मांडून त्यावर वस्त्र टाकून तांदळावरती मूर्ती किवा घट ठेवावा (शेतातल्या मातीसह धान्य पेरून)
सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके| शरण्ये त्रिम्बकेगौरी नारायणी नमोस्तुते| आवाहनार्थे अक्षता समर्पयामि
पळीने ताम्हनात दोनदा पाणी सोडून प्रत्यक वेळी क्रमाने खालील मंत्र म्हणावे.
१) पाद्यं समर्पयामि २) आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )
दुर्वा घेऊन पुढील मंत्र म्हणत पाण्याने घट किवां मूर्तीवर प्रोक्षण करावे....स्नानमं समर्पयामि .|
दुर्वा घेऊन पुढील मंत्र म्हणत पंचामृतने घट किवां मूर्तीवर प्रोक्षण करावे....पंचामृत स्नानमं समर्पयामि |
खालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध, सेंदूर अर्पण कराव्यात.
1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि ४)सेंदूर समर्पयामि |
पुढील मंत्राने कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावे.....वस्त्रमं अर्पयामि. |
पुढील मंत्राने काजळ अर्पण करावे...नेत्रभूषणार्थे .काजलम प्रतिगृह्यताम् | काजलम समर्पयामि |
पुढील मंत्राने मंगळसूत्र अर्पण करावे...कंठभूषणार्थे .मंगळसूत्रम प्रतिगृह्यताम् | मंगळसूत्र समर्पयामि |
पुढील मंत्राने कंकण अर्पण करावे.हस्तभूषणार्थे .कंकणम प्रतिगृह्यताम् | कंकण समर्पयामि |
पुढील मंत्राने जोडवी अर्पण करावे...पदभूषणार्थे जोडवीम प्रतिगृह्यताम् | जोडवी समर्पयामि |
या मंत्राने ओटी भरावी .. सौभाग्य परिमल द्रव्यम समर्पयामि |
या मंत्राने आरसा दाखवावा...शृंगार दशनार्थे दर्पणम दर्शयामि |
पुढील मंत्राने फुले दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं, दुर्वाकुरमं समर्पयामि |
पुढील मंत्राने फुले दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं, दुर्वाकुरमं समर्पयामि |
पुढील मंत्राने अत्तर व बुक्का अर्पण करावे-----नाना सुगंधी परिमल द्रव्यम समर्पयामि |
उदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि |
प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा ब्रम्हनेन नमा ||
नैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्हनात पाणी सोडावे
१) हस्त प्रक्षालन........ २) मुख प्रक्षालन .........
पुढील मंत्राने पानाच्या विडयावर खारिक,बदाम, हळकुंड,खोबरे.सुपारी ठेऊन दुसऱ्या विड्यावर,
सुपारी व दक्षणा ठेऊन दोन्हीवर पळीने पाणी सोडावे मुखवासार्थे पूगीफलतांबुल समर्पयामि |
दक्षणा समर्पयामि | खालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा
सर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि | .नमस्करोमि ||
शंख घंटा कलश आणि दीप यावर फक्त गंध व पाकळ्या सहित अक्षताने पूजन करून आरती करावी