भगवान श्री जिव्हेश्वर पायी दिंडी संपन्न
सिडको (नाशिक -९) :- वस्त्र कलेचे आध्य निर्माते व साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या नामाभिधानाने, साळी संत वैकुंठवासी लहरीनाथ महाराज उर्फ साळीबाबा यांच्या कृपाशिर्वादाने, ह.भ.प. उत्तम महाराज चव्हाण यांच्या सोज्वळ प्रेरणेने व साळी समाजबांधवाच्या सहकार्याने भगवान श्री जिव्हेश्वर : नाशिक ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे आयोजन पौष व. ९ अर्थात दि. १४ जाने. २०१५ बुधवार रोजी करण्यात आले होते. वारकरी संप्रदायाची पौष वारी अर्थात संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे दि. १६ जाने. २०१५ शुक्रवार रोजी होती. हे दिंडीचे तृतीय वर्ष होते.
दि. १४ जाने. २०१५ बुधवार रोजी साळी समाजाचे गणपती मंदिर, डिंगर अळी, जुने नाशिक येथून दिंडीचे प्रस्थान झाले. त्यानिमित्त सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत ह.भ.प. उत्तम महाराज चव्हाण व ह.भ.प. रामदास महाराज धारणकर यांचे अभंग गायन झाले. त्यामध्ये साळी समाजबांधव श्री. मनिष शेकटकर, विजय राउत, दीपक मानकर, गणेश वाझट यांनी भाग घेतला.
सकाळी १० वा. साळीबाबांचे शिष्य ह.भ.प त्र्यंबक महाराज भोसले यांचे दिंडीचे स्वागत साळी समाजाचे शहराध्यक्ष श्री मोहन गायकवाड यांनी केले त्यावेळी श्री लोंढे तात्या, श्री प्रकाश दिवाने, जगन्नाथ एलगट, रमेश खिंडारे, सुभाष जयरंगे, सौ. राधा खिंडारे, श्रीमती गायकवाड आदि उपस्थित होते. त्या दिंडीत आपली दिंडी सहभागी झाली.