स्वकुळ धारा - भाग ६
साळीमाता आकिंनीदेवीचां प्रथम पुञ लोमहर्ष यांस ब्रम्हज्ञाना संपादन करण्यासाठी गुरु कडे जाण्याचा उपदेश
साळीमाता आकिंनीदेवी या ब्रम्हतेजातुन उत्पन्न झाल्यामुळे त्या आपल्याला ज्ञान व भक्ती प्रदान करतात .
लोमहर्ष यांस लहानपणापासून त्यांनी ध्यान व नामस्मरणाची गोडी लावली पुढे लोमहर्षाने स्वकर्म काय करावे आसे विचारले आसता त्यांनी त्यांस ऋषी बगदालभ्य यांच्या कडे गुरु उपदेश घेण्यासाठी पाठवले ( ऋषी बगदालभ्य हे आपल्या साळी वंशाचे प्रथम गुरु आहेत ).
ऋषी बगदालभ्य यांनी लोमहर्ष यांस ब्रम्हज्ञाना प्रदान करून ऋषी बनवले हेच ते साळी वंशाचे महानतपस्वी ऋषी लोमहर्ष आहेत. साळीमाता आंकिनीदेवी यांचे तिन पुञ चंद्रकांत , क्षेत्रपाळ आणि पार्श्वनाथ यांनी आपल्या थोरले ब॑धु ऋषी लोमहर्ष यांच्या कडुन ब्रम्हज्ञान प्राप्त केले .
साळीमाता आकिंनीदेवी यांच्या चारही पुञांनी ब्रम्हचारी राहून ब्रम्हज्ञाना चा आभ्यास करून सात्विक आशा श्रावकधर्माची निर्मिती केली आणि पार्श्वनाथानी त्याची आचरण संहिता निर्माण केली .
म्हणुन आपले स्वकुळ हे सात्विक कुळ आसुन त्याच्यातील परंपरा व आचरण आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करायला हावा
।स्वकुळ साळी सात्विक साळी।
।स्वकुळ साळी सुसंस्कृत साळी।
।। हर हर जिव्हेश्वर ।।
. . . . . . . . . . . ( क्रमश: )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे