श्री जिव्हेश्वर माऊली
जय जय जिव्हेश्वर माऊली
तू कृपेची सावली सावली ।।
तव स्मरण नित्य घडूदे ।
तूझे चरणी जीव जडूदे ॥
सदा वसुदे हीच भावना ।
नित्य माझ्या मनी॥
जय जय जिव्हेश्वर माऊली ॥
तूझे चरण पूजा साधन ।
तूझा मंत्र मनन चिंतन ॥
मनन चिंतनी मग्न राहूदे।
आस ही पुरवी ॥
जय जय जिव्हेश्वर माऊली ॥
कलीयुगी तूझा अवतार ।
द्न्याती जणांचा करी उद्धार ॥
स्वकुळांचा तूहि तारक ।
म्हणूनि आम्ही साळी ॥
जय जय जिव्हेश्वर माऊली॥
काव्य - मुरलीधर रायबागकर, पुणे
+९१-९९२१२३८१८२