भ. श्री. जिव्हेश्वर भक्ती अभियान

Share


प्रती, 
स्वकुळ साळी  समाज यांना, 
आपले कुलदैवत भ जिव्हेश्वर आणि त्यांची पत्नी माता अंकिनिदेवी व माता द्शांकीनिदेवी  तसेच त्यांचे दहा पुत्र असा आपला भ. जिव्हेश्वर परिवार असून आपले कुलदैवत समजून घ्या  या लेखातून त्यांच्या कार्या विषयी समजून घेऊन आपल्या उपेक्षित राहिलेल्या कुलदैवतास सन्मानपूर्वक देव्हाऱ्यात स्थापन करून आपल्या जीवनातील प्रमुख कार्ये संपन्न करूयात.  आपल्या कुलदेवताचे चरीत्र फार विशाल सूर्या प्रमाणे असुन  त्याचे गुण वर्णन सर्व समजणे  आपल्या शक्तीबुध्दी  बाहेरचे आहे. माझ्या अल्पबुध्दीला त्यांच्या कार्याचा प्रकाश किरण  दिसला तो मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी यापेक्षा ज्यांना जास्त माहिती असेल  त्यांचे मार्गदर्शन मिळावे हि विनंती. तरी अवधानाने काही चूक आढळल्यास किंवा कुणाच्या मनाला लागण्या   सारखे वाक्य आढळल्यास त्याचा सकारात्मक विचार करून मोठ्या मनाने   मार्गदर्शन करावे. भ.जिव्हेश्वर या आपल्या कुलदेवता तसेच माता अंकिनीदेवी आणि माता  द्शाकिनीदेवी यांची आपल्याला काय माहिती आहे. असा प्रश्न मनाला विचारल्यावर   असे उत्तर येते कि आपणास फारच त्रोटक माहिती आहे. म्हणून आपले कुलदैवत   समजुन घेण्याचा प्रयन करू यात.   

भ. श्री.जिव्हेश्वारांचा जन्म कैलासावर आदिमायेच्या आज्ञेने शिवशंकराच्या जिव्हेतून  झाला मानवाची लज्जा रक्षण करण्या करिता वस्त्र विणण्याचे काम त्यांच्यावर  सोपविण्यात आले. पण त्यांचे कार्य आणि कर्तृत्व एवढ्यापुरते मर्यादित नाही.  त्यांनी त्यावेळेचे उच्चशिक्षण वेदाभ्यास करून वेदमूर्ती ही पदवी प्राप्त केली तसेच   युद्धकलेत पारंगत होऊन रिठासुर राक्षसास मारले .आईवडिलांची सेवा करून आपल्या   पुढे आदर्श ठेवला. कुलदैवत भ.जिव्हेश्वर आणि त्यांच्या पत्नी माता अंकीनिदेवी व माता द्शाकीनिदेवी    हे  न कोपणारे तसेच त्रास न देणारे कुलदैवत आहे. त्यांच्या व्रताने व पूजनाने  आणि त्यांचे नवरात्र करण्याने सदैव विद्या , यश ,भरभराट ,शांती, सुखसमाधान प्राप्त होते.  तसेच संकटे आणि अडीअडचणी पासून सुटका होऊन मंगल होते. .......|| जय जिव्हेश्वर

भ.श्री.जिव्हेश्वर जिवन चरीत्र
कैलासावर शिवशंकर व मातापार्वती बसलेले असताना सर्व देव त्यांना भेटण्यास आले बोलण्याच्या ओघात मानवाच्या वस्त्रहिनतेचा विषय निघाला. शिवशंकरांनी विष्णूच्या सल्ल्याने आदिमायेचे आवाहन केले. आदिमायेने शंकरास पुत्र निर्माण करण्यास सांगितले.शिवशंकरांनी आपल्या जिव्हेतून तेजपुंज व दैदीप्यमान पुत्र निर्माण केला.शिवशंकराच्या  जिव्हेतून निर्माण झाल्यामुळे त्यांचे नाव जिव्हेश्वर असे ठेवण्यात आले.व वस्त्र विणून  मानवाची लज्जा रक्षण करण्याचे काम त्यांना देण्यात आले.त्याना सर्व देवांनी वस्त्र  विणण्याच्या मागाचे भाग व यंत्र बनवुन मदत केली. त्याच्यावर भ.जिव्हेश्वारांनी आद्य  वस्त्र तयार करून आदिमायेकडे दिले ते पाहून आदिमायाने प्रसन्न होऊन ते वस्त्र देवी पार्वतीस दिले.  पार्वतीच्या मनात आले हे सुंदर असे वस्त्र माझ्या मुलाच्या लग्नात घालण्यास जपुन ठेवीन. आदिमायाने देवी पार्वतीच्या मनातला विचार ओळखून ब्रम्हदेवाकडे सुचक नजरेने पाहिले.ब्रम्हदेवाने आपल्या ब्रम्हतेजातुन तपस्विनी पुत्रीची निर्मिती केली.ती ब्रम्हतेजाच्या अंकीत म्हणून तिचे नांव अंकिनी. ती तपस्विनी असल्याने आपल्याला  तप आणि भक्तीची साधना प्रदान करते .तसेच सावित्रीने आपल्या दिव्य तेजातुन कन्या प्रगट केली.ती दहा गुणसंपन्न म्हणुन दशकिंनी हि देवी कला व विद्या वरदायानी आहे.

आदिमायेने या दोन्ही कन्यांचा विवाह भ.श्री.जिव्हेश्वारांच्या बरोबर लावण्याचे योजले. इंद्र, चंद्र, सुर्य, वरूण, कुबेर या देवांनी सुशोभित अशा विवाह-मंडपाची रचना केली. अन्नपुर्णेने अन्नपुर्णेच्या श्रेष्ठ शाकपाक पक्वांन्नांची सिद्धता झाली. सारे देव जमा झाले. मंगल वाद्यांच्या सुस्वर निनादात, पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रथम व्रतबंधन करून माघ शुद्ध द्वादशीच्या   शुभ मुहूर्तावर भ. जिव्हेश्वारांचा अंकिनी व दशांकिनी यांच्याबरोबर विवाह संपन्न झाला.   अनेक प्रकारचे आहेर दिले गेले. भ. जिव्हेश्वारांनी सर्व देवदेवतांना भरजरी सुंदरनक्षीकलेची  वस्त्रे भेट दिली ब्राम्ह्देवानी भ जिव्हेश्वारांना ॠवेद आणि सामवेद आंदण दिले .  वेदशास्त्रचे शिक्षण घेण्यास ब्रम्हलोकी येण्यास सांगितले शिवशंकरानी त्यांना वेदशास्त्राचे  शिक्षण घेण्यास ब्रम्हदेवाकडे जाण्याची आज्ञा केली भ. जिव्हेश्वर ब्रम्हलोकी गेल्यावर   ब्रम्ह्देवानी प्रसन्न होऊन त्यांना वेदशास्त्राचे ज्ञान देण्यास सुकर्मा ब्राम्हण नियुक्त   केला.पण सुकर्मा कपटी व कावेबाज असल्याने त्याने भ. जिव्हेश्वरांना वेदाचे शिक्षण   देण्यास टाळाटाळ केली. भ. जिव्हेश्वारांना वेदाचे शिक्षण दिले तर हा व याचे कुळवंश  आपल्या वरचढ होईल म्हणून त्याने कपट कारस्थान रचले.

त्याने आपले जानवे तोडून व अंगावर मारल्याच्या खुणा करून ब्रम्ह्देवापासी  जाऊन तक्रार केली की जिव्हेश्वारांने  माझ्यावर हात उगारला. ब्रम्ह्देवानी सुकर्माच्या  पान –३  कपटाला फसुन खात्री न करता भ. जिव्हेश्वारांना वेदांचे शिक्षण घेण्यास बंदी केली.आणि  सुकर्मास आपला डाव यशस्वी झाल्याचा आनंद झाला.पण शिवशंकरा प्रमाणे सरळ व भोळ्या असणा-या भ. जिव्हेश्वरांना ही गोष्ट सहन झाली नाही.ते अतीव दु:खाने मूर्च्छित  पडले हि बातमी कैलासावर शिवशंकरांना समजली शिवशंकर त्रिशूल घेऊन ब्रम्हलोकावर धावले सर्व ब्रम्हलोकात पळापळ सुरु झाली   त्यामुळे ब्रम्हदेवाने घाबरून सुकर्मास पुढे करून सर्व वृतांत सांगून क्षमादान   मागितले व भ. जिव्हेश्वारास सावध करण्याची विनंती केली .शिवशंकरानी भ.जिव्हेश्वराला   सावध केले ब्रम्हदेवाला शाप दिला की तुमचे वेद राक्षस चोरतील आणि सुकर्मास    पण शाप दिला की तुला व तुझी सर्व पिढी भिक्षुकी ( दान दक्षिणेवर ) करून जगेल.  भ जिव्हेश्वारांना शिवशंकरांनी कैलासावर नेऊन गुरुमंत्र देऊन स्वतः वेदशास्त्राचे शिक्षण दिले  पुढील भविष्य ओळखुन युद्यकलेचे आणि सर्व शस्त्र अस्त्रांचे शिक्षण प्रदान केले.

सुकर्मा ब्राम्हण शाप मिळाल्या मुळे सुडाने पेटुन उठला तो शिवशंकराच्या शत्रू  राक्षसराज मनोबलास जाऊन मिळाला.त्याचा पुत्र रिठासुर क्रूर व उन्मत्त होता. सुकर्माने  त्याला आपल्या जाळ्यात ओढून कैलासावर स्वारी करण्यास प्रवृत्त केले.रिठासुर कैलासावर  चालून गेला . तेव्हा शिवशंकर कैलासावरती नव्हते माता पार्वतीने आपल्या दुर्गा रूपातील  सर्व शस्त्रे भ. जिव्हेश्वरना देऊन युद्धावर पाठवले. भ. जिव्हेश्वरांनी शंखनाद केला तो ऐकून  राक्षस सैन्य सैरावैरा पळू लगले.आणि  भ जिव्हेश्वरांनी राक्षस सैन्य मारण्याचा सपाटाच  लावला.हे पाहून रिठासुर दैत्य प्रचंड खवळला मोठ्याने आरोळी मारून भ जिव्हेश्वारांच्यावर  धावला भ जिव्हेश्वरांनी त्याच्या बरोबर तुंबळ युद्ध करून त्याला आपल्या तीक्ष्ण बाणाने   घायाळ केले. नंतर शक्तीबाण सोडून त्याला ठार मारले.तेव्हा स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली.  शिवशंकर आणि माता पार्वतीला आनंद झाला.कैलासावर देवी अंकिनी व देवी दशांकिनी यांनी  भ.जिव्हेश्वारांना ओवाळू स्वागत केले. कैलासावर शिवशंकरांनी भ जिव्हेश्वारांचा सत्कार सोहळा  केला.राक्षसराज मनोबलास पश्चाताप झाला त्याची पत्नी सगुण हि शंकराची भक्त होती तिच्या  सांगण्यावरून मनोबल आणि सगुणा शिवशंकरना शरण गेले व आपला पुत्र रिठासुराला   जिवंत करा म्हणू लागले. शिवशंकर आणि माता पार्वतीला त्यांची दया आली व त्यांनी  भ जिव्हेश्वरांच्या संमतीने रिठासुरास जिवंत केले.रिठासुराने भ. जिव्हेश्वरांची क्षमायाचना  करून सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला वस्त्र व दागिने स्वच्छ करण्याची सेवा त्याला   देण्यात आली तेंव्हा पासुन रिठ्याने भरजरी वस्त्र आणि दागिने साफ करण्याची पध्दत पडली.

भ. श्री. जिव्हेश्वर परिवाराचे जीवनातील महत्व

भ. श्री. जिव्हेश्वरांचे ग्रहस्थ जीवन कैलासावर मातापित्याची सेवा आणि सुंदर वस्त्र च्या  विणण्यात चालले होते त्यांच्या पत्नी माता अंकीनिदेवी व माता द्शाकीनिदेवी त्यांना वस्त्र  विणण्यात मदत करीत होत्या माता अंकीनिदेवी हिला चार पुत्र झाले १) लोमहर्ष २) चंद्रकांत ३) क्षेत्रपाळ ४) पार्श्वनाथ हे सर्व साधना करून ब्रम्ह्चारी राहिले व पुढे त्यांनी श्रावकधर्म निर्माण करून त्याचा प्रसार करीत रहिले म्हणून जैनातील श्रावकधर्माचे आचार आणि कापड व्यवसायातील साम्य आपल्या साळी समाजात आढळते. माता अंकीनिदेवी ही ब्राम्ह्पुत्री असून ती तपस्विनी आहे. तिच्या हातात जपमाळ असुन आपल्याला तप, भक्ती, साधना प्रदान करते व आध्यात्मिक जीवनात ध्यान व नामसाधनेचे संकेत देते. समाज्यातील थोर संत,योगी,कीर्तनकार ,वारकरी आध्यात्मिक वाटेवरील साळी समाजातील व्यक्ती ह्या माता अंकीनिदेवीच्या प्रेरणा आहेत. माता द्शाकींनिदेवीला सहा पुत्र झाले या पुत्रांनी साळी वंशवृक्षाचा विस्तार केला. यांना देवांनी व राजांनी वस्त्र विणण्यास नेले १) कैलासभुवन- हा इंद्राकडे राहिला त्याने आहेर साळी शाखा निर्माण केली.२)  सनातन - विष्णूकडे राहिला त्याने स्वकुळ साळी शाखा निर्माण केली ३)  भक्तिमान -हा यमाकडे राहिला त्याने बांगड साळी शाखा निर्माण केली.  ४) पर्वकाळ-- हा ब्रम्हदेवाकडे राहिला त्याने शुद्ध (सुत)साळी शाखा निर्माण केली.  ५) दयासागर--हा कैलासावर राहिला त्याची पुढची पिढी स्वकुळ साळी शाखेत विलीन झाली.  ६) अर्चन- हा पृथ्वीवर काशीचा राजा सुशील याच्या कडे वास्तव्य केले. यांच्या पुढील पिढी  कडून साळी वंश वाढला.आता सर्व साळ्यांच्या शाखा ऐकञ झाल्या आहेत. माता द्शाकींनिदेवी ही ब्रह्मपत्नीसावित्रीची कन्या आहे व शारदेची (सरस्वती)ची बहिण आहे.

तिच्या हातात पुस्तक असुन  ती कला व विद्या प्रदान करते की ज्यामुळे आपण जीवनांत चरितार्थ चालवून स्थैर्य प्राप्त करू  शकु. याचे उदाहरण म्हणजे  आपला समाज पेशवाई आणि इंग्रज राज्यात विस्थापित झाला.  त्या वेळी वेगवेगळ्याप्रकारे कला व उद्योग साह्याने व आपली पुढची पिढी विद्येने शिक्षित  करून सुशिक्षित समाज उभा केला.आज वेगवेगळ्या पदांवर काम करणारे उच्चपदस्थ अधिकारी  यशस्वी उद्योजक, नोकरदार मंडळी,व्यवसायिक ,कलावंत,गायक.अभिनेते ही माता द्शाकींनिदेवीने  आईच्या मायेनी दिलेल्या विद्या आणि कला यांचा अविष्कार आहे.आपले कुलदैवत भ जिव्हेश्वार  चारी गुणांनी युक्त आहेत वेदाभ्यास करून वेदमूर्ती   ही त्यावेळेच्या उच्चशिक्षणाची पदवी प्राप्त करून ब्राम्हण हा गुण संपादित केला आहे.

त्यामुळे साळी समाजाला वेदाचा व धर्मपुजेचा अधिकार आहे आपल्या समाजात पेशवे काळात असंख्य वेदमूर्ती आणि धर्मविधी व पुजा करणारे होते.भ जिव्हेश्वारांनी शिवशंकराच्या पासून  युद्धकलेचा वारसा घेतल्याने क्षत्रिय गुण सुद्धा जोपासला असल्याने साळी समजात लढवय्ये  सैनिक,सैन्य अधिकारी ,स्वतंत्रसैनिक पोलीस दलातील व्यक्ती अन्याय व अंधश्रद्धा गैरसमजुती कालबाह्यगोष्टी विरोधात लढणारे समाज बांधव हे  भ. जिव्हेश्वरांच्या क्षत्रियवृत्तीचे प्रतिक आहेत.  विविध व्यवसाय करणारे भ. जिव्हेश्वरांच्या वैश्य गुणांचे प्रागटिकरण आहे.कलेने सेवा करणारे कलावंत सेवा या गुणांची देणगी आहे असा भ. जिव्हेश्वर परिवार असून कुठल्याही अंधश्रद्धा व गैर समजुती यांचा विचार नकरता तसेच कालबाह्य झालेल्या गोष्टी टाकून सकारात्मक आणि  मंगलमय विचारांच्या साह्याने  भ. जिव्हेश्वर परिवारला आपल्या परिवारांतील देवघरात  सन्मानपूर्वक स्थान देऊन त्यांची नित्य पूजा करून आपली संकटे नाहीशी करून ताणतणाव   आपल्या जीवनातून हद्दपार करू. तसेच भ जिव्हेश्वर व्रत ,भ जिव्हेश्वर हवन व, जिव्हेश्वर पाठ  माता अंकीनिदेवी व  माता द्शांकीनिदेवी पुजन,आणि नवरात्र ,भ. जिव्हेश्वर जन्म नवरात्र  या व्रतवैकल्या मुळे समाज आपोआप ऐकञ येऊन संघटीत होईल.तसेच आपल्या तरूण व   किशोरवयीन मुलामुलींना सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.


संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम


नोट - लेखनाविषयी काही चर्चा करायची असल्यास कृपया येथे संपर्क साधावा - मो. ०९४२३०१०३८८ 

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...