भ.श्री जिव्हेश्वर अवतार
श्रावणमासी सोमवासरे शुध्दत्रयोदशीला ।
शंकरांच्या जिव्हाग्रातून जिव्हेश्वर प्रकटला ॥
सुर्योदयी जन्माआला सुर्यवंशी गोत्राला ।
स्वकुळांचे अंगझाकत स्वंय स्वकुळ जहाला ॥
आदिमायेच्या आद्न्येवरूनि जन्माला आला ।
शंकरांच्या जिव्हाग्रातून जिव्हेश्वर प्रकटला ॥1॥
तेहतीस कोटी देवगणांनी माग धारण केला ।
स्वकुळांची वस्त्रे विणन्या जिव्हेस्वर सिध्द जहाला॥
आदिमायेच्या आद्न्येवरूनि जन्माला आला ।
शंकरांच्या जिव्हाग्रातून जिव्हेश्वर प्रकटला ॥2॥
धागा धागा अखंड विणता साळी तो झाला ।
स्वकुळ कुलोत्पोन्न तो कुलपती ठरला ॥
आदिमायेच्या आद्न्येवरूनि जन्माला आला ।
शंकरांच्या जिव्हाग्रातून जिव्हेश्वर प्रकटला ॥3॥
काव्य - मुरलीधर रायबागकर, पुणे
+९१-९९२१२३८१८२